मुंबई : भास्कर जाधव आणि संजय कुटे यांच्यातील बाचाबाचीनंतर भाजपच्या विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ओबीसी आरक्षणासाठी बाराच काय, 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही अशा शब्दांत राज्य सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी अनेकदा सभागृहात बाचाबाची झाली, मात्र कुणाचेही निलंबन झाले नाही असेही ते म्हणाले.
मंत्र्यांनी ही स्टोरी तयार केली
चेंबरमध्ये शिवी देणारे कोण होते हे सर्वांनी बघितले आहे. तिथे शिवसेनेच्या सदस्यांनी येऊन धक्काबुक्की केली, त्यानंतर बाचाबाची झाली. यानंतर आशिष शेलारांनी सर्वांच्या वतीने भास्कर जाधव यांची माफी मागितली आणि विषय संपवून आम्ही बाहेर आलो. मात्र त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांनी आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी ही स्टोरी तयार केल्याचा आरोप फडणवीसांनी केला.