मुंबई:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सरकारमधील विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy CM )यांनी त्यांच्या अभिनंदनचा ठराव सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपा युतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्याचे जाहीर केले हा जनतेच्या मनातला कौल होता आम्हाला दूर सारून विचित्र आघाडी करण्यात आली मात्र शेवटी जनतेच्या मनातील सरकार आज स्थापन होत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते विश्वास दर्शक ठराव संमत झाल्यानंतर अभिनंदनच्या ठरावावर ते बोलत होते
सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले-ठाणे जिल्ह्यातील किसन नगर येथील एक शाखाप्रमुख एकनाथ शिंदे आपल्या कार्याने मोठा होतो धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली त्याचे त्यांना फळ मिळत गेले 2004 पासून त्यांनी चार वेळा सतत आमदारकी मिळवली आहे अतिशय निष्ठावान आणि सच्चा शिवसैनिक असलेल्या एका शिवसैनिकाला आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचे पाहून आपल्याला आनंद होत आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.
आंदोलनांचीदखल घेतली पाहिजे : गेल्या अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या किंवा आवाज उठवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा धडाका लावला होता काही लोक आंदोलन करतात त्यांची आंदोलने योग्य असतात त्याची दखल घेतली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही सरकारने सूडबुद्धीने वागू नये हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणाऱ्या खासदाराला बारा दिवस तुरुंगात डांबण्यात येते ही अतिशय निंदनीय बाब आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.