मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या नव्या निवासस्थानी 'शिवतीर्थ' ( Shivteerth residence ) येथे दाखल झाले आहेत. फडणवीस यांच्यासोबत अमृता फडणवीसही आहेत. मात्र, या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. ही एक कौटुंबिक भेट असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी फडणवीस सहपत्नीक 'शिवतीर्थ'वर -
राज्यामध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. काही महिन्यातच होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकामध्ये भाजपा आणि मनसेची युती होणार का याची पुन्हा जोरदार चर्चा रंगू लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आज (बुधवारी) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे सह पत्नी भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही नेत्यात दिलखुलास संवाद -
देवेंद्र फडवणीस यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. भेट कौटुंबिक असल्याचे सांगितले जात आहे मात्र असे असले तरी या भेटीत सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर चर्चा होऊ लागली आहे. या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात हे दोन्ही नेते दिलखुलास संवाद करताना दिसत आहेत.
सचिन, संजय राऊत यांनी घेतली होती भेट -
राज ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस अनेक महिन्यानंतर आज भेटले आहेत. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे का यावर देखील आता चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी काही दिवसापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भेट दिली होती. या दोन्ही भेटी देखील कौटुंबिक असल्याचे सांगण्यात आले होते. संजय राऊत यांच्या मुलीचे लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज फडणवीसांनी राज यांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा -MH Schools to Start : पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याबाबत आरोग्य विभागाचा हिरवा कंदील