मुंबई राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे आक्रमक नेते अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते आहेत. शिवसेनेला कंट्रोल करण्यासाठी शिंदे सरकारने विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांची सभागृह नेता पदी नियुक्ती केली आहे. भाजपाची ही खेळी असली तरी अंबादास दानवे Ambadas Danave यांना कशाप्रकारे ती कशी मोडून काढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल महिनाभर राज्य सरकारचा कारभार सांभाळला. विरोधकांनी यावरून शिंदे सरकारला धारेवर झाले होते. महिनाभरानंतर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. खातेवाटप ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला केले. विरोधकांनी यावरून शिंदे सरकार व टीकेची झोड उडवली असताना, आता पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.
अंबादास दानवेना रोखण्यासाठी नवी रणनीती :राज्यात शिवसेनेत बंडखोरी केलेल्या शिंदे गटावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. अशातच शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेल्या अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दानवे शिंदे गटाला नियमित आव्हान देत असतात. आता सभागृहात शिंदे गट विरोधात अंबादास दानवे असा सामना रंगणार आहे. सरकारमधील मंत्र्यांना उशिराने खाते वाटप दिले आहे. विरोधीपक्ष नेते दानवे नवनिर्वाचित मंत्र्यांना यावरून विधान परिषदेत कोंडीत पकडतील. संबंधित मंत्री यावेळी अडचणीत येऊन सरकारची गोची होऊ नये, यासाठी अंबादास दानवे यांना रोखण्यासाठी नवी रणनीती आखली असून विधान परिषदेच्या सभागृह येथे पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याचे बोलले जाते.