मुंबई -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ( मंगळवारी ) मोठा धमाका ( Opposition Leader Devendra Fadnavis ) केला. भाजपाच्या नेत्यांविरोधात सरकारी वकीलच षडयंत्र रचत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यावर आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांना दिलेल्या पुराव्याची सत्यता पडताळण्याचे काम गृह विभागाकडून सुरु असल्याचे पाटील यांनी म्हटले ( Satej Patil On Fadnavis Allegation ) आहे.
विधानभवात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर गृह विभागाने काम सुरु आहे. तसेच, सरकारी वकील यांच्या कार्यालयात अथवा घरात लावण्यात आलेला कॅमेरा कोणी लावला? कॅमेरा लावण्यामागचे उद्दिष्ट काय होते? याबाबत चौकशी केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारवर एवढा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
मात्र, आरोप करताना एक बोट सरकारकडे असले तरी, उरलेली बोटं भाजपाकडे आहेत. यापूर्वीही फोन टॅपिंग करुन काही नेत्यांची नावे अडकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला गेला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ही प्रकरणे बाहेर येत आहे, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.