मुंबई - मागच्या पाच वर्षात अनेक अडकलेली काम मार्गी लावली आहेत. कोस्टल रोड तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. रो रो सेवा सुरू केली, बीडीडी चाळ प्रकल्प सुरू केला. ठाकरे सरकार एलएनटी कंपनीला मदत करायला तयार नाही. तसेच धारावीचा प्रश्न आम्ही सोडवला, असे फडणवीस यांनी सांगितले. .
2022 मध्ये मुंबई पालिकेत भाजपचीच सत्ता - फडणवीस
20:23 November 18
जनहिताचे प्रश्न भाजप सरकारच्या काळात मार्गी लावले
20:19 November 18
नुसत्या बदल्या करण्यात हे सरकार व्यस्त होते
मुंबई- महाविकास आघाडी सरकार नुसत्या बदल्या करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. सामान्य जनतेचा विश्वासघात या सरकारने केला आहे. जो गरिबांकरता काम करतो त्यांच्या पाठी लोकं उभी राहतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
20:14 November 18
कोरोनामुळे नुकसान झाल्याने पॅकेज जाहीर केले नाही
मुंबई - कोरोनामूळे नुकसान झाल्याने राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले नाही. तसेच हजार कोटींची सवलत देऊ असे म्हणाले होते, पण कुठे आहे सवलत. केंद्र सरकारने 9000 कोटी देऊ केलेले ते घेतले नाही, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
19:46 November 18
2022 मध्ये मुंबई पालिकेत भाजपचीच सत्ता - फडणवीस
मुंबई - देशाच्या सर्वाधिक केसेस मुंबईत आणि महाराष्ट्रात का ? मुंबईतील मृत्यू दर कोरोनामूळे वाढला होता. महाराष्ट्रासारखी भीषण अवस्था दुसऱ्या राज्यात पाहिली नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.