मुंबई -गोव्यातील विजयानंतर ही लढाई तूर्तास संपली नसून पुढे आपल्याला मुंबईला भ्रष्टाचारातून ( Devendra Fadnavis Spoke About Mumbai Corruption ) मुक्त करायची आहे, असी प्रतिक्रिया देत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Critisized Shivsena ) यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला मारला आहे.
गोव्याचे निवडणूक प्रभारी व राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस ( Devendra Fadnavis ) यांचा आज मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीत भरभरून यश संपादन केल्याप्रकरणी भाजपतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री आमदार कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आलं याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणीस यांनी लढाई अजून संपलेली नाही, असे सांगत येणाऱ्या महानगरपालिकेचा शंखनाद फुंकला आहे.
मुंबई महानगर पालिकेवर भाजपचा महापौर-
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात प्रथम मोदी यांचे व जनतेचे आभार मानले. ज्या गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने ताकद लावून गोव्यातून भाजपची सत्तापालट करण्याची तयारी केली होती. त्या गोव्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मते हे नल नोटाच्या मता पेक्षाही कमी असल्याचे सांगत देवेंद्र फडणीस यांनी शिवसेना व राष्ट्रवादीची खिल्ली उडवली. त्याच सोबत गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात शिवसेनेने मोठी प्रचारसभा घेतली होती व वातावरण निर्मिती करण्याचं काम त्यांनी केलं होतं. परंतु प्रमोद सावंत यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला फक्त 97 मत भेटल्याच ही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितल. मोदींचा विश्वास मतांमध्ये परिवर्तित झाल्याचं दिसून आलं असं म्हणत मोदींनी सामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला असही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदींची जादू देशांनी पाहिली आहे असे सांगत लढाई अजून संपलेली नाही असंही ते म्हणाले. येणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचा महापौर बसवणार असल्याचंही सांगत त्यांनी निवडणुकीचा शंखनाद फुंकला आहे.
हेही वाचा -Sanjay Raut : अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे तपास यंत्रणांवर दबाव होत नाही -राऊत