मुंबई - देशाची अखंडता, सायबर सुरक्षीतता, व्यक्ती स्वांतत्र्य तसेच सायबर डेटा चोरी याबाबत कडक पावले उचलत मोदी सरकारने सोमवारी चायनीज अॅपवर बंदी आणली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संबंधित निर्णयाची घोषणा केली. याला भारत-चीन सीमावादाची पार्श्वभूमी आहे. याबाबत तज्ज्ञाचे मत जाणून घेऊया...
बंद करण्यात आलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक आणि 'व्ही-चॅट'सह 59 अॅप्सचा समावेश आहे. संबंधित अॅप्स फोनवरून संवेदनशील माहिती त्यांच्या सर्व्हरवर हस्तांतरित करतात. याचा अयोग्य वापर होऊ शकतो. यासंदर्भात अनेक तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या होत्या. अनेकांचा वैयक्तिक डेटा चोरल्याचे देखील समोर आले. काही प्रकरणांमध्ये, गोपनीयतेचा करार मोडल्याचे उघडकीस आले आहे. या अॅप्समध्ये काही अतिशय लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. टिक-टॉक, कॅमस्कॅनर आणि यूसी ब्राउझरचा समावेश आहे. टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि शेअर-इट या अॅप्सचा देशातील मुख्य आर्थिक घडामोडींमध्ये मोठा वाटा आहे. भारतातील अनेक नागरिक या कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न देखील सरकारला सोडवावा लागणार आहे.