मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. आधी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ( Dilip Walse Patil Meets Sharad Pawar ) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pande ) हे देखील उपस्थित होते. 20 ते 25 मिनिटे ही बैठक झाली. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST Workers Maharashtra ) केलेल्या हल्लाच्या ( Silver Oak Attack ) घटनेचा अहवाल तयार करण्यात आला ( Silver Oak Attack Report ) असून, हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या बैठकीत सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच या बैठकीआधी गृहमंत्र्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली. ही भेट केवळ पाच ते दहा मिनिटांची होती. या भेटीदरम्यान काल झालेल्या घटनेबाबत शरद पवार यांच्याशी गृहमंत्र्यांनी चर्चा करत या अहवालाची एक प्रत शरद पवार यांना दिली असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांची घटनेनंतर पोलिसांवर नाराजी :एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या उग्र आंदोलनाबाबत मुंबई पोलिस तसेच गुप्तचर यंत्रणांना कल्पना का नव्हती? याबाबत अहवालात बोट ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती मिळते. मग पोलिसांना का मिळत नाही? असा प्रश्न देखील या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे कामात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.