महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय करत नरहरी झिरवाळ पायी गेले घरी - मल्लिकार्जुन खर्गे

राज्यसभेची निवडणूक ( Rajya Sabha Election 2022 ) जिंकण्यासाठी आहे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये महा विकास आघाडी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावली. बैठकीनंतर आपल्या आमदारांची आणि अपक्ष आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय करण्यात आली. मात्र, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे हॉटेलपासून आपल्या शासकीय निवसस्थानी पायी चालत गेले.

नरहरी झिरवाळ
नरहरी झिरवाळ

By

Published : Jun 8, 2022, 10:08 AM IST

Updated : Jun 8, 2022, 11:52 AM IST

मुंबई- राज्यसभेची निवडणूक ( Rajya Sabha Election 2022 ) जिंकण्यासाठी आहे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावली. बैठकीनंतर आपल्या आमदारांची आणि अपक्ष आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय करण्यात आली. मात्र यामध्येही विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा साधेपणा पाहायला मिळाला. संध्याकाळी बैठक झाल्यानंतर सर्व प्रमुख नेते आपापल्या महागड्या गाड्यातून आपल्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. मात्र, नरहरी झिरवाळ यांनी हॉटेलमधून थेट आपल्या शासकीय निवासस्थानी पायी चालत जाणे पसंत केले.

पायी जाताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

कोणताही गाजावाजा नाही, बडेजावपणा न करता विधानसभेचे उपाध्यक्ष थेट चालतच आपल्या घरी पसंत केले. हॉटेल ते शासकीय निवासस्थान एवढे अंतर जवळपास एक ते दीड किलोमीटर असेल. आपल्या सहकाऱ्यांसोबत चालत त्यांनी घरी जाणे पसंत केले. आपल्याला संधी मिळेल तेव्हा नेहमीच आपण मुंबईत चालत जाण्याचा प्रयत्न करतो, असे ते यावेळी म्हणाले. याआधी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा साधेपणा नेहमीच पाहायला मिळाला आहे.

राज्यसभेची निवडणूक ( Rajya Sabha Election 2022 ) तब्बल 24 वर्षांनी होत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची मंगळवारी (दि. 7 जून) हॉटेल ट्रायडंट येथे बैठक बोलावली होती. विधानसभेतून राज्यसभेत जाणाऱ्या सहा जागांसाठी पैकी सहावी जागा छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या संख्याबळावर अवलंबून आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची भेट घेतली. तर अनेकांशी संपर्क साधल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर विकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या सर्वच पक्षाच्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ), एच के पाटील आदी वरीष्ठ नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. छोटे व अपक्ष आमदारांनी आपल्या भूमिका यावेळी स्पष्ट केल्या.

लवकरच होणार दुसरी बैठक -गेल्या 24 वर्षांत राज्य सभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे बहुतांश आमदारांना या निवडणुकीची प्रक्रिया माहीत नाही. ही प्रक्रिया समजून सांगण्यासाठी मंगळवारी (दि. 7 जून) बैठक बोलावली होती. उत्साहाच्या वातावरणात ही बैठक झाली. मोठ्या संख्येने आघाडी सरकारला पाठिंबा दिलेले आमदार उपस्थित होते. काहींनी परवानगी घेतली होती. काही उशिरा येणार असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. कोणीही सोडून बाहेर जाणार नाही. लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा -Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा

Last Updated : Jun 8, 2022, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details