मुंबई - नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीला आणि विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला दिले असल्याचे निश्चित झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हिवाळी अधिवेशनानंतरच राज्याला मिळणार 'उपमुख्यमंत्री' - उपमुख्यमंत्री हिवाळी अधिवेशन झाल्यावर
प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच झालेली पाहायला मिळत होती. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला, तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद सोडण्यात आल्याचे वृत्त मिळाले होते. मात्र, त्यानंतरही या दोन पदावरून अंतर्गत वाद सुरू होते. यावर कोणीही स्पष्टीकरण देत नव्हते. मात्र, आज प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आल्याचे सांगितले आहे.
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा शेवट हा 22 डिसेंबरच्या जवळपास होणार असून त्यानंतरच राज्याला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.