मुंबई -आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागाच्या कामानाच नाही तर अन्य विभागांच्या कामांचीही पडताळणी सुरू आहे. शेवटच्या दिवसांत त्या सरकारने ४०० जीआर काढले होते. त्याची पडताळणी होणारच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरेंची मुलाखत हे मॅच फिक्स असल्याचेही देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) म्हणाले. अतिवृष्टीच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. याचा पुन्हा आढावा आम्ही सगळे घेणार आहोत. सगळ्या जिल्ह्यांचे जे काही सर्वेक्षण आहे त्याच्यावर आधारित आम्ही निर्णय निश्चितपणे करू आणि अजित दादांच्या सरकारने जो काही निर्णय केला होता त्याच्यापैक्षा अधिक चांगला निर्णय कसा करता येईल याबाबत आम्ही प्रयत्न करून असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर काँग्रेसने आज ( मंगळवारी ) राज्यभरात आंदोलन केले. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते संपूर्ण आंदोलन हे फक्त नेत्यांना दाखवण्याकरता होत आहे. प्रत्येक जण आपला फोटो कसा येईल एवढा पुरत ते आंदोलन करत आहे. आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही काहीतरी केला आहे. हे दाखवण्यासाठी हे आंदोलन त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही. लाईव्ह मॅच मी बघत असतो खरी माहिती बघत असतो. काही दिवसांनी जेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतील तेव्हा प्रतिक्रिया देऊ, असेही फडणवीस म्हणाले.