महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar Refused Merge ST : एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण होणार हे डोक्यातून काढून टाकावे- अजित पवारांची स्पष्ट भूमिका - Mandatory Payment Of Electricity Bill Farmers

राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पस्ट शब्दात विलीनीकरणास नकार दिला ( Ajit Pawar Refused Merge ST ) आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारची ( State Government On ST Merge ) भूमिका स्पष्ट केली. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाकावे, असे ते म्हणाले.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Dec 24, 2021, 10:02 PM IST

मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपाचा ( ST Workers Strike ) आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर दिले. एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. एसटीचे शासनात विलीनीकरण होईल, हे डोक्यातून काढून टाकावे ( Ajit Pawar Refused Merge ST ), अशा शब्दांत त्यांनी सरकारची भूमिका ( State Government On ST Merge ) मांडली.


वैधानिक विकास महामंडळांना निधीची कमतरता भासू देणार नाही

यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील वैधानिक विकास महामंडळांना ( Statutory Development Corporation ) निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. घरी आणि विविध नुकसान झालेल्या लोकांना एसडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली आहे. पुरवणी मागण्यांमध्येही चौदाशे दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

दारूबंदी नंतर चंद्रपुरात गुन्ह्यांची वाढ- पवार

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी ( Liquor Ban In Chandrapur ) उठवावी यासाठी आलेल्या वेदनांची संख्या, ही कायम ठेवावे यासाठी आलेल्या निवेदनांचा संख्यपेक्षा प्रचंड मोठी होती. चंद्रपुरात दारूबंदी असताना हिंसाचाराची ( Violence After Liquor Ban ) अनेक प्रकरणे वाढली होती. गुन्हेगारी वाढली होती ( Crime After Liquor Ban ), आता ती कमी झाल्याचा दाखला पवार यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांनी वीज बिले भरावीत- पवार

राज्यातील कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल भरणे अनिवार्य ( Mandatory Payment Of Electricity Bill Farmers ) आहे. शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत दिली जाईल. बिले टप्प्याटप्प्याने भरून घेतली जातील, मात्र शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे आवश्यक असेल, असे स्पष्ट शब्दात पवार यांनी सभागृहात सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details