महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्टेअरिंग कोणाच्या हातात...? उद्धव ठाकरेंना अजित पवारांकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा - अजित पवार यांच्या ठाकरेंना शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या या शुभेच्छानंतर त्यांचे ते ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी ट्विटरमध्ये जोडलेला फोटो.... शुभेच्छाच्या ट्विटमध्ये जो फोटो जोडला आहे. त्या फोटोतून अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग कोणाच्या हातात यावर भाष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ajit pawar wishes cm
उद्धव ठाकरेंना अजित पवारांकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

By

Published : Jul 27, 2020, 9:43 AM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (सोमवारी) ६० वा वाढदिवस आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी यावेळी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांचा पहिल्यांदाच वाढदिवस असल्याने राजकीय, सामाजिक, सास्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, या शुभेच्छामध्ये अजित पवारांनी दिलेल्या शुभेच्छा जरा हटके आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या या शुभेच्छानंतर त्यांचे ते ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी ट्विटरमध्ये जोडलेला फोटो. शुभेच्छाच्या ट्विटमध्ये जो फोटो जोडला आहे. त्या फोटोतून अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग कोणाच्या हातात यावर भाष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच या ट्विवटमधून अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करत उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास व्यक्त केला आहे.

ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलेल्या फोटोत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे एकाच गाडीत बसले आहेत. पण, त्यात ड्रायव्हर सीटवर अजित पवार बसले आहेत आणि शेजारील सीटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले आहेत. त्या वाहनाचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात आहे.

कारण रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून विरोधकांच्या तीन चाकी सरकार या टिकेला प्रत्युत्तर देताना हे तीन चाकी सरकार असले तरी याचे स्टेअरिंग माझ्या हातात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी गाडीचे स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचा फोटो टाकून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या शुभेच्छा देण्यासाठी वापरण्यात आलेल्या फोटोवरुन आता जोरदार राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details