मुंबई- शहरालगतच्या जमिनी एनए करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांचाDeputy Chief Minister Devendra Fadnavisनिर्णय विकासकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आहे. तसेच जमीन एनए करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभी राहणार असल्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा मुजोरपणा मोडणार decision to NA suburban land beneficial आहे.
जमिनी एनए करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणाराज्यातील मुख्य शहरालगतच्या जमिनी (एनए) अकृषिक प्रयोजनात उपयोगासाठी करण्याबाबतचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेणार, असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली Devendra Fadnavis on NA suburban land आहे. या निर्णयामुळे शेती सोडून इतर वापरासाठी देखील जमीन उपयोगात आणता येणार आहे. या जमिनीचा वापर नागरिकांच्या वास्तव्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येईल, असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासोबतच या जमिनी एनए करण्यासाठी महसूल विभागाशी चर्चा करू. सोप्या पद्धतीने विकासकांना मिळवता यावी. यासाठी देखील ऑनलाइन यंत्रणा तयार करणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
निर्णयाचा विकासकांनी सामान्य नागरिकांना फायदानव्या सरकारने हा निर्णय घेतल्यास या निर्णयाचा खूप मोठा फायदा आणि सामान्य नागरिकांना होईल, असं म्हटलं जातंय. सध्या मुख्य शहरांमधल्या जमीन जवळजवळ संपलेल्या आहेत. त्यामुळे वास्तव्यासाठी नवीन इमारत बांधायला जागा शोधणे कठीण होते. मुंबई, पुणे, नवी मुंबई यासारख्या शहरांमध्ये घर घेणं किंवा व्यवसायासाठी जागा घेणे, हे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. तशीच काहीशी परिस्थिती राज्याच्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील निर्माण झाली आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नवीन रहिवासी इमारती तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा ही विकासकांना उपलब्ध होईल. याचा थेट फायदा विकासकाम सोबतच राज्यातील सर्वसामान्य जनतेला देखील होणार आहे.