महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सदैव प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री अजित पवार

संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यत दिलेले योगदान तसेच देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री

By

Published : Dec 5, 2021, 9:01 PM IST

मुंबई- संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यत दिलेले योगदान तसेच देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. क्रांतिसिंहांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. यावेळी ते बोलत होते.

क्रांतिसिंह नाना पाटील खऱ्या अर्थाने ‘क्रांतिसिंह’ होते. महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या असहकार चळवळीपासून इंग्रज सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘प्रतिसरकार’ आंदोलनापर्यंतचा त्यांचा लढा भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या दीड हजार गावात ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. हे इंग्रज सरकारविरोधातील मोठे धाडस होते. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान दिले. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडतीतील योगदानामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्थान आपल्या सर्वांच्या मनात कायम वरचं असेल व ते सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा -ST Workers Strike : संप फोडण्यासाठी महामंडळाची शक्कल; आता कारवाईनंतर बदल्यांचा बडगा

ABOUT THE AUTHOR

...view details