महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेश विसर्जनासाठी पवई तलाव सज्ज, महापालिकेकडून कृत्रिम तलावांचीही सुविधा - update ganeshotsav news in mumbai

उपनगरातील पवई तलाव यंदा गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून विविध सुविधा आणि नियमावली तयार करून या तलावावर गर्दी न होण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

mumbai
पाहणी करताना उपमहापौर सुहास वाडकर

By

Published : Aug 19, 2020, 10:07 PM IST

मुंबई - पूर्व उपनगरातील महत्व पूर्ण तलाव असणारे पवई तलाव यंदा गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून विविध सुविधा आणि नियमावली तयार करून या तलावावर गर्दी न होण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी पवई तलावावरील सुविधांची पाहणी करण्यासाठी मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर यांनी भेट देत तलावातील परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडेही उपस्थित होते.

पवई तलाव हे पूर्व उपनगरातील अतिशय महत्वपूर्ण तलाव असून या तलावात दरवर्षी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन पवई तलाव करण्यात येते. पवई, भांडूप, कांजूर, विक्रोळी ,घाटकोपर ,जोगेश्वरी आदी ठिकाणचे गणपती विसर्जन पवई तलाव येथे करण्यात येते. पण यंदा देशभरात आलेल्या कोरोना संकटावर मात करत गणपती विसर्जन वेळी गर्दी होवू नये यासाठी पालिकेकडून नियमावली आखली आहे. त्याचबरोबर प्रत्येक विभागात कृत्रिम तलावाची सोय पालिकेकडून करण्यात आल्याने पालिकेसह पोलीसही सज्ज झाले आहे.

यावेळीही पवई पोलीस ठाणे ,एस विभाग महानगरपालिकेच्या विशेष देखरेखेखाली पवई तलाव परिसरात संरक्षण आणि सुविधा तैनात करण्यात आले आहे. पवई तलावात मगर असल्याने विसर्जन वेळेस अघटित घटना घडू नये यासाठी महानगरपालिकेकडून पवई तलावात विशेष बोटी , विसर्जन मोटर बोटी, तसेच मगर किनाऱ्यावर येऊ नये यासाठी तलावात जाळे पांघरण्यात आले आहे.

दीड दिवसाचा बाप्पा विसर्जनानंतर तीन दिवस ,पाच दिवस ,सात दिवस आणि दहा दिवंसांचा बाप्पा विसर्जनासाठी ही पोलीस तसेच महानगरपालिकेकडून पवई तलाव परिसरात विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून कोरोनाचे संकट असल्याने गर्दी टाळावी यासाठी एस विभाग महानगर पालिका सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी, एस विभाग अंतर्गत प्रभागनिहाय कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.


त्याची माहिती पुढीलप्रमाणे:

प्रभाग १०९: श्रीराम पाडा

प्रभाग ११०: कैलास कॉम्प्लेक्स समोर.

प्रभाग १११: साई नगर भांडुप पूर्व

प्रभाग ११२: श्री प्रमोद महाजन गार्डन

प्रभाग ११३: जापनिझ गार्डन

प्रभाग ११४: रमाबाई आंबेडकर नगर

प्रभाग ११५: लाला शेठ कंपाऊंड

प्रभाग ११६: प्रताप नगर, स्कायलाईन टॉवर समोर

प्रभाग ११७: परिवार गार्डन

प्रभाग ११८: विद्यामंदिर हायस्कुल जवळ

प्रभाग ११८: बालगंधर्व गार्डन

प्रभाग ११९: बाबासाहेब आंबेडकर गार्डन

प्रभाग १२१: फिल्टर पाडा

प्रभाग १२२: तिरंदाज गार्डन

ABOUT THE AUTHOR

...view details