मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे राष्ट्ररक्षक जनमंचाकडून बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी विशेष तपास दलाची नेमणूक करावी, म्हणून मागणी करण्यात आली आहे. राष्ट्ररक्षक जनमंचचे अध्यक्ष रमेश जोशी यांच्याकडून ही मागणी करण्यात आली असून पूजा चव्हाणचा अनैसर्गिक मृत्यू झाला असून सर्व प्रकार संशयास्पद असल्यामुळे यासंदर्भात सीआरपीसी 154 (1)मधील तरतुदीनुसार संबंधित पोलीस ठाण्यात सर्वप्रथम गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्ररक्षक जनमंचातर्फे करण्यात आली आहे.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी विशेष तपास दल नेमण्याची राज्यपालांकडे मागणी - mumbai news today
सीआरपीसी 154 (1)मधील तरतुदीनुसार संबंधित पोलीस ठाण्यात सर्वप्रथम गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्ररक्षक जनमंचातर्फे करण्यात आली आहे.
संजय राठोड यांचे नाव येत असल्याने केली मागणी
पूजा चव्हाणच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव येत असल्याचे वृत्त वेगवेगळ्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे पूजा चव्हाण अनैसर्गिक मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली होती. त्यामुळे राज्यपालांनी या संदर्भात आदेश देत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबद्दल तपास करण्यासाठी एका विशेष पोलीस दलाची नेमणूक करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात राष्ट्ररक्षक जनमंचकडून करण्यात आलेली आहे.