मुंबई - कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीमधील डॉक्टरांच्या मानधन-पगारात भिन्नता आहे, असे म्हणत आयुर्वेदिक-युनानी-होमिओपॅथी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानुसार पगार-मानधनात वाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. तर आता त्यांच्या या मागणीला ‘आयुष टास्क फोर्स'नेही सकारात्मकता दर्शवत पगार-मानधनवाढ देण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.
आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी डॉक्टरांनाही पगारवाढ द्या, 'आयुष टास्क फोर्स'ची शिफारस - कोरोना डॉक्टरांचा पगार
डॉक्टरांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत एमबीबीएस डॉक्टरांइतका 80 हजार रुपये पगार देण्याची मागणी केली आहे. या मागणीला आता आयुष टास्क फोर्सनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
ग्रामीण-दुर्गम भागात आयुषमधील डॉक्टर कोरोनासाठी काम करत आहेत. तर आता लवकरच आयुष टास्क फोर्सच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर आणि मेट्रो सिटीमध्ये ही कामे सुरू होणार आहेत. अशावेळेस आयुर्वेदिक-युनानी-होमिओपॅथी डॉक्टरांना 24 ते 28 हजार रुपये पगार मिळतो. जेव्हा की एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार रुपये पगार मिळतो. तर निवासी, इंटर्न आणि बंधपत्रित डॉक्टरांच्याही विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. कोविडसाठी काम करणाऱ्या डॉक्टरांना याचा लाभ मिळत आहे.
या पलीकडे जात केरळवरून येणाऱ्या डॉक्टरांनाही 80 हजार ते 2 लाख पगार दिला जात आहे. अशावेळी कोविड योध्दा म्हणून काम करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या बाबतीत असा दुजाभाव का? असे म्हणत या डॉक्टरांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत एमबीबीएस डॉक्टरांइतका 80 हजार रुपये पगार देण्याची मागणी केली आहे. या मागणीला आता आयुष टास्क फोर्सनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार कोविडसाठी काम करणाऱ्या या डॉक्टरांनाही 80 हजार रुपये पगारवाढ द्यावी, अशी शिफारस करण्यात आल्याची माहिती आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिली आहे. या शिफारशीमुळे पगारवाढ मिळण्याची शक्यता वाढल्याचे म्हटले जात आहे.