मुंबई - घाटकोपर पूर्व येथे असलेल्या रमाबाई नगरमधील हत्याकांडाला आज 24 वर्ष पूर्ण झाली. ११ जुलै १९९७ रोजी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेनंतर राज्य राखीव दलाचा फौजदार मनोहर कदम याने केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. रमाबाई आंबेडकर नगरात 10 शहिदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र अजूनही न्याय मिळाला नसल्याने आंबेडकरी कार्यकर्ते नाराज आहेत.
ही घटना घडली त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. तर तत्कालीन गृहमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून सीआयडीने एक अहवालही तयार केला होता. मात्र तो अद्याप गुलदस्त्यात असून, तो आंबेडकरी जनतेसाठी आता तरी खुला करावा, अशी मागणी येथील रहिवासी आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पद्माकर धेनक यांनी केली आहे. पुतळा विटंबनेतील आरोपींना शोधण्यापेक्षा तो अहवाल बाहेर काढला तरी प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असेही धेनक यांचे म्हणणे आहे.
रमाबाई नगर हत्याकांडाला २४ वर्षे पूर्ण, सीआयडी अहवाल जाहीर करण्याची मागणी - रमाबाई नगर हत्याकांड
घाटकोपर पूर्व येथे असलेल्या रमाबाई नगरमधील हत्याकांडाला आज 24 वर्ष पूर्ण झाली. ११ जुलै १९९७ रोजी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेनंतर राज्य राखीव दलाचा फौजदार मनोहर कदम याने केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता.
राज्य राखीव दलाचा तत्कालीन फौजदार मनोहर कदम याने केलेल्या गोळीबारात रमाबाई आंबेडकर नगरातील कौसल्या पाठारे, सुखदेव कापडणे, मंगेश शिवशरण, विलास दोडके, अमर धनावडे, नंदू कटारे, संजय कांबळे, संजय निकम, अविनाश गरुड आणि बबलू वर्मा या 10 जणांचे बळी गेले होते.
पाठपुरावा करणार -
११ जुलै १९९७ रोजी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या हत्याकांड प्रकरणी जो सीआयडी अहवाल तयार करण्यात आला. मात्र तो अद्याप २४ वर्षे उलटली तरी जाहीर करण्यात आलेला नाही. त्याबाबत आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप हे पाठपुरावा करणार आहेत. आज सकाळी त्यांनी रमाबाई नगरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले.
वंचित बहुजन आघाडीनेही वाहिली शहिदांना श्रद्धांजली -
घाटकोपर पूर्व येथे असलेल्या रमाबाई नगरमधील हत्याकांडाला आज 24 वर्ष पूर्ण झाली असून आज रविवार दिनांक 11 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.