महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेस्टच्या २ हजार २३६ कोटी तुटीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी, पालिकेकडे अनुदानाची मागणी - तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीला सादर

सामान्य मुंबईकरांना परिवहन सेवा देणारा बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रम गेले कित्तेक वर्षे तुटीचा अर्थसंकल्प सादर करत आहे. बेस्ट उपक्रमाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २ हजार २३६.४८ कोटी तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीला सादर केला. ही तूट पालिकेने अनुदान देऊन भरून काढावी, या मागणीसह बेस्ट समितीने अर्थसंकल्प मंजूर केला आहे.

बेस्ट
बेस्ट

By

Published : Dec 15, 2021, 6:37 PM IST

मुंबई- मुंबईमध्ये बेस्ट आणि रेल्वे सार्वजनिक वाहतुकीची साधने आहेत. यामधून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे या दोन्ही सेवांना मुंबईकरांची जीवनवाहीनी म्हटले जाते. सामान्य मुंबईकरांना परिवहन सेवा देणारा बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रम गेले कित्तेक वर्षे तुटीचा अर्थसंकल्प सादर करत आहे. बेस्ट उपक्रमाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २ हजार २३६.४८ कोटी तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीला सादर केला. ही तूट पालिकेने अनुदान देऊन भरून काढावी, या मागणीसह बेस्ट समितीने अर्थसंकल्प मंजूर केला आहे.

महापालिकेकडून ६ हजार १५६ कोटी अनुदान -

सन २०२०-२१ या लेखा वर्षासाठी बेस्ट उपक्रमाच्या सेवकवर्ग सदस्यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून ६ हजार १५६ कोटी रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले. त्या अनुषंगाने महाव्यवस्थापकांनी सादर केलेल्या उत्पन्नात ४ हजार ९८५.१८ कोटी वरुन ५ लाख ४ हजार ६७४ कोटी रुपये इतकी वाढ झाली. सन २०२०-२१ या वर्षासाठीच्या सानुग्रह अनुदानाच्या प्रदानासाठी ६ हजार १५६ कोटी रुपये इतके अनुदान महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमास प्राप्त झाले व वितरित करण्यात आले त्या अनुषंगाने महाव्यवस्थापकांनी सादर केलेल्या खर्चात ६ हजार ६२६.६० कोटी वरुन ६ हजार ६८८.१६ कोटी रुपये इतकी वाढ झाली.

२०२१-२२ मध्ये १ हजार ६४१.४२ कोटीची तूट -

सन २०२१-२२ या वर्षातील सुधारित अर्थसंकल्पानुसार १ हजार ६४१.४२ कोटी रुपये इतकी तूट भरून काढण्यासाठी आणि अद्ययावत सुधारित बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम मधील तरतुदीनुसार १ लाख रुपये एवढी किमान रोख शिल्लक ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामधून बेस्ट उपक्रमाच्या अर्थसंकल्पाकडे हस्तांतरीत करण्यासाठी १ हजार ६४१.४३ कोटी इतक्या रकमेचे अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमास देण्यात यावे, असे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

२ हजार २३७ कोटी पालिकेने द्यावेत -

सन २०२२-२३ या वर्षातील बेस्ट उपक्रमाच्या अर्थसंकल्पातील २ हजार २३६.४८ कोटी रुपये इतकी तूट भरून काढण्यासाठी आणि १ कोटी रुपये इतक्या सानुग्रह अनुदानाच्या तरतुदीसह व अद्ययावत सुधारित बृहन्मुंबई महापालिका अधिनियमामधील तरतुदीनुसार १ लाख एवढी किमान रोख शिल्लक ठेवण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पामधून बेस्ट उपक्रमाच्या अर्थसंकल्पाकडे हस्तांतरीत करण्यासाठी महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमास २ हजार २३७.४९ कोटी रकमेचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे.

हे ही वाचा -Kareena Maid COVID Positive : करीनाच्या मोलकरणीला कोरोना, अभिनेत्रींच्या संपर्कातील 110 लोक निगेटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details