मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा आणि महाविद्यालये ( Schools and colleges in state ) सुरु झाली आहेत. त्यानंतर आता पुन्हा कोरोना आणि ओमायक्रॉनच्या विषाणूने ( variants of omicron ) धूमाकुळ घातला आहे. म्हणून कोरोनाच्या दोन्ही डोसनंतर ही बूस्टर डोसची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच येत्या मार्च महिन्यापासून इयत्ता दहावी ( 10th board exam ) आणि बारावीची बोर्ड परीक्षा ( 12th board exam ) ऑफलाइन होणार आहे.
Students and Teacher Vaccination : बोर्ड परीक्षार्थी व शिक्षकांना बूस्टर डोस प्राधान्य देण्याची मागणी
ओमायक्रॉनचे ( variants of omicron ) संकट दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या मार्च महिन्यापासून इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन होणार आहे. त्यामुळे या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम लसीकरण करावे. तसेच बोर्ड परीक्षेशी संबंधित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बूस्टर डोसचे ( Booster Dose Vaccination ) लसीकरण प्रथम प्राधान्याने करावे. अशा मागण्यांचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीने मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री (Minister of School Education )यांना दिले आहे.
त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आणि बोर्ड परीक्षेशी संबंधित असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बूस्टर डोसचे लसीकरण प्रथम प्राधान्याने करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी भाजप शिक्षक आघाडीचे ( BJP teachers lead )प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. त्याचबरोबर याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.
प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे -
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण नवीन वर्षात 3 जानेवारी पासून करण्याची घोषणा केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. राज्यात १५ मार्चला इयत्ता दहावी आणि ४ मार्चला बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता दहावी व बारावीचे २६ लाखाच्यावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांच्याबरोबर लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या परीक्षा प्रक्रियेत समाविष्ट असणार आहे. या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांवर बोर्डाची परीक्षा योग्य पद्धतीने घेण्याची जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली आहे.
लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करावी -
महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच शिक्षकांचे लसींचे पहिले दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत अंतर्भूत असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुद्धा आरोग्य सेवकांप्रमाणे बूस्टर डोस प्रथम प्राधान्याने देण्यात यावा. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करावी. अशी मागणी प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बयाजी घेरडे आणि सुभाष अंभोरे यांनी केली आहे.