महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सनराईस हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - सनराईस रुग्णालय न्यूज अपडेट मुंबई

भांडुप पश्चिम येथील सनराईस हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता लागलेल्या आगीमध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी तसेच गंभीर असून याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. याप्रकरणी अनधिकृत सनराईस हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By

Published : Mar 27, 2021, 3:17 PM IST

मुंबई -भांडुप पश्चिम येथील सनराईस हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता लागलेल्या आगीमध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोविडमुळे आधीच मृत्यू पावलेल्या रुग्णांचे २ मृतदेह आगीत पूर्णपणे खाक झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी तसेच गंभीर असून याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. याप्रकरणी अनधिकृत सनराईस हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

'रुग्णालय अनधिकृतच'

भांडुप येथील ड्रीम्स मॉल व सनराईस हॉस्पिटलला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले की, हे रुग्णालय अनधिकृतच आहे. सदर रुग्णालयास नियमानुसार महापालिका परवानगी देत नव्हती. या आधी अग्निशामन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. विकास नियंत्रण नियमावली प्रमाणे मॉलमध्ये वापरात बदल (चेंज ऑफ युज) करून रुग्णालय सुरू करता येत नाही मग हे रुग्णालय कसे सुरू करण्यात आले? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

रुग्णालयाला परवानगी देताना नियम धाब्यावर

रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक कायदा नियम, अटी व शर्तीचे कुठलेही पालन न करता हे रुग्णालय उभारले होते. परंतु या रुग्णालयास परवानगी मिळत नसताना कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढला आणि लॉकडाऊन झाले. या संधीचा फायदा घेत प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी या खासगी रुग्णालयास विशेष बाब म्हणून कोविड रुग्णालय अशी परवानगी महापालिकेच्या एस विभागाने राजकीय दबावापोटी दिली. त्याची परिणीती आज दहा रुग्णांचे नाहक प्राण जाण्यात झाली. सनराईस रुग्णालयात आग लागल्यानंतर तिथे अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती. अग्निशमन दल तिथे पोहोचल्यानंतर त्यांना रुग्णालयापर्यंत जाण्यास बरेच अडथळे असल्यामुळे आग विझवण्यासाठी खूप उशीर झाला. सनराईस रुग्णालय हे खासगी रुग्णालय असल्याने रुग्णांकडून मनमाई फी आकारली जात होती असा आरोप ही यावेळी शिंदे यांनी केला आहे.

हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगरसेविकेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

सनराईस रुग्णालयाबाबत स्थानिक भाजपा नगरसेविका साक्षी दळवी यांनी वारंवार तक्रार करूनही त्याकडे राजकीय दबावापोटी दुर्लक्ष करण्यात आले. सदर तक्रारीला लेखी उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी आरोग्य एस विभाग यांनी सनराईस हॉस्पिटल यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच अग्निशामक अधिकारी यांनी ना हरकत प्रमाणपत्रही दिले असे सांगितले. ही बाब अत्यंत गंभीर आहे, तरी या अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा -'फॅशन स्ट्रीट'च्या आगीत 500 पेक्षा जास्त दुकाने खाक

ABOUT THE AUTHOR

...view details