महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

New Corona Variant : डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला नव्या व्हायरसची एन्ट्री!

भारत सरकारने राज्यांना कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. यात नव्या व्हायरसने आता हजेरी लावल्याचे दिसले आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंट डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला डेल्टाक्रॉन ( New Deltacron virus entry in India ) भारतात पोहोचला आहे.

New Corona Variant
डेल्टाक्रॉन

By

Published : Mar 23, 2022, 12:52 PM IST

मुंबई - भारत सरकारने राज्यांना कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. यात नव्या व्हायरसने आता हजेरी लावल्याचे दिसले आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंट डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला डेल्टाक्रॉन ( New Deltacron virus entry in India ) भारतात पोहोचला आहे. काही राज्यांत या व्हेरिअंटचे संशयित रुग्ण समोर आले आहेत. तेलंगाना टुडेच्या हवाल्याने मनी कंट्रोलने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारताच्या कोविड जिनेमिक्स कंसोर्टियम (INSACOG) आणि GSAID ने इशारा दिला आहे की, देशात डेल्टाक्रॉनचे 568 रुग्ण तपासणीच्या टप्प्यात आहेत.

नवीन व्हायरसबद्दल माहिती -तज्ञांच्या मते, हा एक सुपर सुपर-म्युटंट व्हायरस आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव BA.1 + B.1.617.2 आहे. तज्ञांनी सांगितले आहे की डेल्टा आणि ओमायक्रॉनचा बनलेला एक संकरित स्ट्रेन आहे, जो गेल्या महिन्यात सायप्रसमधील संशोधकांनी पहिल्यांदा शोधला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे मानले. पण आता ब्रिटनमध्ये रुग्ण समोर येत आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोना विषाणूचा एक संकरित प्रकार आहे. जो डेल्टा आणि ओमायक्रॉन पासून बनला आहे. कर्नाटकात 221 डेल्टाक्रॉनने बाधित रुग्ण सापडल्याचे संकेत मिळत आहेत. तिथे हॉटस्पॉट बनला आहे. यानंतर तामिळनाडू 90, महाराष्ट्र 66, गुजरात 33, पश्चिम बंगाल, तेलंगाना 25, नवी दिल्ली 20 रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

नवीन व्हायरस किती खतरनाक -शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूचा प्रादुर्भाव फ्रान्समध्ये जानेवारी 2022 मध्ये सुरू झाला आणि पहिला रुग्ण आढळला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) म्हणणे आहे की, ओमायक्रॉन आणि डेल्टा रीकॉम्बिनंट विषाणू पसरत आहेत. डब्ल्यूएचओ शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी म्हटले आहे, की SARSCov2 चे ओमायक्रॉन आणि डेल्टा प्रकार एकत्र पसरण्याची शक्यता आहे. त्यांचे संक्रमण वेगवान असू शकते.

हेही वाचा -BREAKING : मुंबईतील महालक्ष्मी परिसरात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

ABOUT THE AUTHOR

...view details