पुणे -भारतात ऑनलाइन खरेदीने आता चांगलाच जोर पकडला आहे. वेगवेगळ्या वस्तू ऑनलाइन मागवण्याचे प्रमाण वाढलेले होतेच, त्यात गेल्या काही महिन्यांपासून खाद्य पदार्थ ऑनलाइन मागवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या क्षेत्रात अनेक कंपन्या उतरल्या आहेत. ऑनलाइन वस्तू खरेदीसाठी अमेझॉन, फ्लिपकार्ट, अलिबाबा यासारख्या अनेक कंपन्या आहेत तर खाद्य पदार्थ ऑनलाइन पुरवण्यासाठी झोमॅटो, स्विगी यासारख्या कंपन्या आहेत.
लॉक डाऊन काळात तर ऑनलाइन व्यवसायाला सुगीचे दिवस होते. मात्र ज्या डिलिव्हरी बॉईसवर या व्यवसायाची मोठी धुरा आहे, त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जाते का, हा खरा प्रश्न आहे. लॉकडाऊन काळात या डिलिव्हरी बॉइसचे काही कंपन्यांनी प्रत्येक डिलिव्हरीला दिले जाणारे चार्जेस कमी केले. त्यात गेल्या काही काळात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल दरामुळे या डिलिव्हरी बॉईससमोर अडचणी वाढल्या आहेत. या काळात घर प्रपंच कसा चालवायचा, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.
हे ही वाचा - महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, शिवराज सिंह यांनी घेतला निर्णय