कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करावे - आदित्य ठाकरे - Minister Aditya Thackeray
मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत मंगळवारी (१६ फेब्रुवारी) राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत मंगळवारी (१६ फेब्रुवारी) राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी मंत्री ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.