मुंबई- येत्या १ फेब्रुवारीला सादर केला जाणाऱ्या ( union budget 2022 ) अर्थसंकल्पात जनतेला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असल्याने येथे भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसींवरही शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे प्रस्तावित असलेल्या दिल्ली-वाराणसी हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला घोषणा (high speed bullet train ) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील मुंबई - नागपूर हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला ( Mumbai Nagpur Hi speed Bullet train ) ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. याबाबत ईटिव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.वाचा.
देशात वाढलेली बेरोजगारी, भूकमारी सर्वसामान्य जनता संतप्त झाली आहे. कोविडमुळे केंद्राची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.
हेही वाचा-ST Worker Suspension : आज २७० एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; एकूण आकडा साडेसहा हजाराच्यावर
पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळणार गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता गतवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तब्बल 7 हजार 897 काेटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात ( Mumbai Ahmedabad Bullet train ) आली होती. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. याशिवाय गेल्या वर्षभरात देशभरातील प्रस्तावित असलेल्या ७ बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षण करून डीपीआर करण्याचे नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ( एनएचएसआरसीएल) करण्यात आले आहे.
दिल्ली-वाराणसी हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा होण्याची शक्यता?
यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित असलेल्या सात बुलेट ट्रेन प्रकल्पापैकी दोन बुलेट ट्रेन प्रकल्पांना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशांच्या निवडणुका तोंडावर असल्याने मतदारांना खुश करण्यासाठी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्ली-वाराणसी हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा करू शकते. याशिवाय मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला वेगाने दिशा देण्याचे प्रयत्न होऊ शकता वर्तविण्यात येत आहे.
हे आहेत सात बुलेट ट्रेन प्रकल्प -
१२ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्र सरकारने नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची (एनएचएसआरसीएल) स्थापना केली. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम या कंपनीला सोपविले आहे. या कंपनीने देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सप्टेंबर २०२० मध्ये मान्यता दिल्यानंतर देशभरात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही सरकारने एनएचएसआरसीएलला सोपवले आहे. या सात बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प (७३६ किलोमीटर), दिल्ली-वाराणसी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प (८१० किलोमीटर ), दिल्ली-अमृतसर हाय-स्पीड रेल्वे (४६९ किलोमीटर), दिल्ली-अहमदाबाद हाय-स्पीड-रेल कॉरिडोर (६८५ किलोमीटर), मुंबई-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर (६७० किलोमीटर ), चेन्नई-म्हैसूर हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर (४३५ किलोमीटर) आणि वाराणसी-हावडा हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर (६८०किलोमीटर), सारख्या प्रकल्पाचा कामाला गती मिळण्यासाठी यंदा दहा हजार कोटीच्या भरीव तरतुदीची अपेक्षा करण्यात येत आहे.
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी १३१२ नव्या रुग्णांची नोंद, १० जणांचा मृत्यू