महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Petition against Abu Azmi अबू आझमी यांच्याविरोधात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नोंदवला जबाब - Delhi Commission for Women Chairpersons

समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी MLA Abu Azmi हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सदैव चर्चेत असतात. मात्र 2017 मध्ये बंगळुर येथील महीला अत्याचार प्रकरणावर अभद्रपणे बोलने, त्यांना चांगलेच महागात पडले आहे. दिल्ली येथील महीला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती महिवाल Delhi Commission for Women Chairpersons यांनी बोरिवली कोर्टात यासंबंधित याचिका Petition against Abu Azmi दाखल केली होती. यावर आज सुणावनी करण्यात आली.

Abu Azmi
अबू आझमी

By

Published : Aug 20, 2022, 8:06 PM IST

मुंबई 31 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरूमध्ये अनेक महिलांचा विनयभंग Bangalore women molestation case करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणावरुन अबू आझमी यांनी 3 दिवस महिलांवर अनेक आक्षेपार्ह टिका केल्या होत्या. महिला केवळ साडी आणि बुरख्यातच चांगल्या व सुरक्षित असतात,असे वक्तव्य अबु आझमी यांनी त्यावेळी केले होते. तसेच आझमी यांनी पेट्रोल असेल तर आग लागेल, गूळ असेल तर मुंगी येईल, असेही वादग्रस्त वक्तव्य त्यावेळी केले होते. Petition against Abu Azmi

प्रतिक्रीया देतांना स्वाती महिवाल

त्यामुळे अबू आझमी यांचे असे विधान बलात्काऱ्याला प्रोत्साहन देणारे होते. त्यासाठी दिल्ली येथील महीला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती महिवाल यांनी बोरिवली कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाची आज बोरिवली कोर्टात सुनावणी होती. जिथे न्यायाधीशांसमोर त्यांचे जवाब नोंदवण्यात आले. स्त्रियांबाबत अश्या प्रकारची मानसिकता ठेवणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्वाती महिवाल यांनी न्यायालयाकडे केली आहे. आपला न्यायालयावर विश्वास असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.

हेही वाचाDevendra Fadnavis देवेंद्र फडणवीस म्हणतात मी अमिताभ नाही तर अमजद खान, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details