मुंबई -विधान परिषद निवडणुकीच्या ( Legislative Council elections ) मतदानादरम्यान काँग्रेसने भाजपच्या दोन मतदारांनी गुप्तता भंग केल्याचा आरोप ( Allegation of breach of confidentiality ) केला आहे. काँग्रेसच्या या आक्षेपानंतर मतमोजणीला विलंब झाला आहे. अद्याप मतमोजणी सुरू होऊ शकलेली नाही.
Legislative Council Election : काँग्रेसच्या आक्षेपानंतर मतमोजणीला झाला होता विलंब; काय आहे प्रकरण? - Allegation of breach of confidentiality
विधान परिषद निवडणुकीच्या ( Legislative Council elections ) मतदानादरम्यान काँग्रेसने भाजपच्या दोन मतदारांनी गुप्तता भंग केल्याचा आरोप ( Allegation of breach of confidentiality ) केला आहे. काँग्रेसच्या या आक्षेपानंतर मतमोजणीला विलंब झाला आहे. अद्याप मतमोजणी सुरू होऊ शकलेली नाही.
गोपनियतेचा भंग झाल्याचा आरोप -काँग्रेसने भाजपाच्या दोन आमदारांवर मतदानादरम्यान गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोघांनी मतदानासाठी दुसऱ्यांची मदत घेतल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे गोपनियतेचा भंग झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे तक्रारीची शहानिशा होईपर्यंत मतमोजणी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे 5 वाजताच सुरू होणारी मतमोजणी अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच यावेळीही मतमोजणीस बराच उशीर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -Supreme Court : नवाब मलिक, अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका; मतदान करताच येणार नाही