महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पोलिसांची एवढी बदनामी कधीच झाली नाही, शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका - bjp

"दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे." अशी बोचरी टीका शेलार यांनी केली आहे.

मुंबई पोलिसांची एवढी बदनामी कधीच झाली नाही, शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका
मुंबई पोलिसांची एवढी बदनामी कधीच झाली नाही, शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका

By

Published : Mar 17, 2021, 8:02 PM IST

मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं राज्य सरकारवर टीका केली जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे. मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती अशी टीका त्यांनी केली आहे.

शेलार यांचे ट्विट
"एका सामान्य नागरिकाचा खून, एका एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडलं, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच… त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या... दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे." अशी बोचरी टीका शेलार यांनी केली आहे.
दरेकरांचीही टीका
मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणं स्वाभाविक आहे. ज्या प्रकरणात वाझे नावाचा अधिकारी या विषयात सहभागी होता. त्याला कंट्रोल करणारे अधिकारी पोलीस आयुक्त होते. त्यामुळे उद्या या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं तर मुंबई पोलिसांना हा मोठा धक्का असता. त्यामुळे पोलीस आयुक्तांची बदली स्वाभाविक आहे. तसंच पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाही. तर मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचं प्रकरण धसास लागावं हा आमचा हेतू आहे. त्यामुळे आम्ही हे प्रकरण लावून धरलं. याची वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, हे आमचं ध्येय असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : पीपीई कीटमध्ये सचिन वाझेच; काय घडले आज दिवसभरात?

ABOUT THE AUTHOR

...view details