मुंबई -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा अध्यक्षांनी (BJP Yuva Morcha) शिवडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Case) दाखल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर अवमानकारक वक्तव्यामुळे शिवडी न्यायालयात दावा करण्यात आला होता. त्या याचिकेवर आज न्यायालयात दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या याचिकेवर 11 फेब्रुवारी रोजी शिवडी न्यायालय निकाल देणार आहे.
11 फेब्रुवारी रोजी निकाल -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भाजपकडून 25 जानेवारीला शिवडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. या याचिकेवर शिवडी न्यायालयात आज सुनावणी झाली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली असून, कलम 153 बी, 500, 504, 505(2), 506 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.