महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पवईत टेकडीवरून मध्यरात्री हरीण घरात पडले - पवई हरीण

पवई येथील हनुमान टेकडी परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या छतातून एक हरीण घरात पडल्याची घटना घडली आहे. हनुमान टेकडी परिसरात राहणाऱ्या सविता सिंग यांच्या घरात हा प्रकार घडला आहे.

deer fell into house in powai mumbai
पवईत टेकडीवरून मध्यरात्री हरीण घरात पडले

By

Published : May 10, 2020, 12:34 PM IST

मुंबई - पवईच्या हनुमान टेकडी परिसरात काल (शनिवार) मध्यरात्री एक हरीण घराच्या छतावर पडले आणि घराच्या पत्र्यांना छेदून ते घरात कोसळले. अचानक झालेल्या या घटनेने घरात झापेत असलेल्या सदस्यांची एकच तारांबळ उडाली होती.

हनुमान टेकडीवरून मध्यरात्री सविता सिंग यांच्या घरात हरीण पडले...

हेही वाचा...मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे बळी, राज्यात पोलिसांच्या मृत्यूचा आकडा 7 वर

पूर्व उपनगरातील पवई परिसरातील हनुमान टेकडी येथे, सविता सिंग यांच्या घरात हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पॉज-मुंबई ए.सी.एफ. स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. हरणाला वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र संघटनेचे स्वयंसेवकांनी पकडले आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सोबत नेले.

पवईच्या या विभागामध्ये हरीण डोंगरावरून पडल्याची ही दुसरी घटना आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता असल्याने वन्य प्राण्यांचा वावर मानवी रहिवासी परिसरात वाढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details