महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Deepali Syed on Rebel Leaders : सत्तेसाठी मेलेल्या आईचे दूध प्यायलात का? दिपाली सय्यद यांचा बंडखोर आमदारांवर निशाणा

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद या नेहमीच भाजपसह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कडाडून टीका करतात. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर दिपाली सय्यद ( Deepali Syed Vs Shivsena Rebel ) यांनी बंडखोरांना शिवसैनिकांच्या गुणांची आठवण करून दिली आहे.

Deepali Syed News
दिपाली सय्यद बातमी

By

Published : Jul 8, 2022, 7:53 AM IST

Updated : Jul 8, 2022, 8:57 AM IST

मुंबई- भाजप नेते किरीट सोमैय्यांनी ( BJP leader Kirit Somaiya ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ( party chief Uddhav Thackeray ) आक्षेपार्ह विधान केले. यावरून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी यावरून बंडखोर आमदारांना चांगलेच खडे बोल सुनावले. किरीट सोमैय्या बोलणार आणि तुम्ही ऐकून घेणार.? सत्तेसाठी मेलेल्या आईचे दूध प्यायला आहात का? असा थेट प्रश्न शिवसेना नेत्या सय्यद यांनी शिंदे गटातील आमदारांना ( MLAs of Shinde group ) केला आहे.



महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप नेते किरीट सोमैय्या सातत्याने कथित आरोपांचा ( Kirit Somaiya criticized Uddhav Thackeray ) भडीमार सुरू होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतरही सोमैय्या हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमैय्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या, माफिया मुख्यमंत्र्यांना ( Mafia Chief Minister ) हटवल्याबद्दल अभिनंदन, अशी टीका ट्वीटरच्या माध्यमातून किरीट सोमैय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच उद्धव ठाकरे, अनिल परब, संजय राऊत आणि पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केलेल्या कारभाराला माफियाराजच म्हणणार, असेही सोमैय्यांनी ठणकावले.

दिपाली सय्यद यांचे ट्विट

हिच का शिवसेना तुमच्या रक्तात भिनली-शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ( Shiv Sena leader Deepali Syed ) यावरून, थेट बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का? उद्धव साहेबांविरोधात चिरीट तोम्मया बोलणार आणि तुम्ही ऐकुन घेणार.. हिच का शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे? पहिले चिरीटला तुमच्या पंक्तीतुन बाहेर काढा. नंतर शिवसैनिक नाव लावा, अशा शब्दात दिपाली सय्यद यांनी बंडखोर आमदारांना ( Dipali Syed tweet News ) ट्विटरवरून फटकारले आहे.

काय म्हणाले होते किरीट सोमैय्या -यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले की, "सगळ्यात पहिले उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीची माफी मागितली पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात संजय राऊत यांनी 15 पानी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, ईडीचे चार ऑफिसर आणि किरीट सोमैया हे नवलानी यांच्यामार्फत इथल्या व्यावसायिकांना धमक्या देतायेत आणि खंडणी वसूल करत आहेत. या प्रकरणाची यादी देखील चौकशी झाली. त्यावेळी यात ही तक्रार बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते. संजय राऊत यांनी जे भले मोठे पत्र दिले त्यात कोणतेच पुरावे दिलेले नाहीत. यात पुरावा म्हणून काय तर फक्त बॅलन्स शीट जोडली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचची एसआयटी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम बनवली आणि याची चौकशी सुरू केली. त्यानंतर ही केस कोर्टात उभी राहिली.

दिपाली सय्यद यांनी यापूर्वीही केली होती टीका-पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुण्यातील देहू येथील मंदिराच्या लोकार्पण समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने भाजवर टिकास्त्र सोडले. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी देखील ट्विटरवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार, खासदार, नगराध्यक्षांचे पासेस गायब केले. उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतून काढले. पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे.

दिपाली सय्यद यांनी भाजपला दिले होते आव्हान-दिपाली सय्यद यापूर्वीही भाजपवर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, तुम्ही काय माझ्या घरात घुसणार, तुमच्यात तेवढी ताकत आहे का?. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपाचे अनेक नेते आक्षेपार्ह बोलतात. त्याची सुरुवात कोणी केली?, आधी भाजपा नेत्यांच्या घरात घुसला पाहिजे. पंतप्रधान भाजपासाठी सर्वोच्च मग मुख्यमंत्री कोणी नाहीत का?, असा सवालही दिपाली सय्यद यांनी भाजपाला विचारला होता.औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, ही मागणी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. मध्यंतरी शासन स्तरावरही विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली सुरू केल्या होत्या. प्रत्यक्षात शहराचे नाव बदलण्यात आले नसल्याने भाजपकडून शिवसेनेवर सातत्याने टीका होते.

हेही वाचा-Deepali Syed On Fadnavis : 'खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे', दिपाली सय्यद यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

हेही वाचा-Kirit Somaiya On Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे, संजय राऊत, संजय पांडे आता पंतप्रधान मोदींची माफी मागा'
हेही वाचा-Kirit Somaiya : शिंदे गटातील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे घेताच सोमैयांची चुप्पी; राऊत, परबांना इशारा


Last Updated : Jul 8, 2022, 8:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details