मुंबई -शिवसेना आणि राणा दांपत्याचे वैर दिवसेंदिवस वाढत आहे. खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी शिवसेनेच्या बिकेसी येथील सभेवर उद्धव ठाकरे यांची लाचर सभा, अशी टीका केली. या टीकेला शिवसेना प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'नाटक कंपनी, दिल्लीतून काय बोलते, महाराष्ट्र देऊन बोल, असा इशारा सय्यद यांनी दिला ( Deepali Sayeds challenge to Rana couple ) आहे. त्यामुळे राणा आणि शिवसेनामधील वाद पुन्हा एकदा चिघळणार ( Rana Couple Vs Shiv Sena ) आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेयांनी नवनीत राणा यांची हनुमान चालीसा पठणवरून खिल्ली उडवली. नवनीत राणा यांनी याला दिल्लीतून पत्रकार परिषद घेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांची कालची सभा लाचार होती. त्यांनी त्यांच्यात वाक्यावरून पलटी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, रोजगारबाबत कोणतीही घोषणा नाही, असा निशाणा साधला. तसेच सत्ता गेल्यानंतर रश्मी ठाकरे जेव्हा पोलीस कोठडीत जातील, तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारेल की, काय वाटतंय असा प्रश्न विचारणार असल्याचे राणा म्हणाल्या.
Deepali Sayed : नाटक कंपनी.. दिल्लीतून काय बोलते.. महाराष्ट्रात येऊन बोल : शिवसेनेकडून राणा दाम्पत्याला आव्हान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काल बीकेसीत झालेल्या सभेला लाचार सभा म्हणणाऱ्या राणा दाम्पत्याला शिवसेनेने आव्हान दिले ( Rana Couple Vs Shiv Sena ) आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी नाटक कंपनी, दिल्लीतून काय बोलते, महाराष्ट्रात येऊन बोल, अशा शब्दात राणांचा समाचार ( Deepali Syeds challenge to Rana couple ) घेतला.
दीपाली सय्यद नवनीत राणा
शिवसेना प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी यावर भाष्य केले. राणा बाई तुमच्यासारखे खोटे कागदपत्र वापरुन रश्मीताईंना निवडणूक लढण्याचे सवय नाही. बाप लपवण्याची तर पद्धत नाही, असा टोला लगावला. तसेच दिल्लीतून काय बोलते, महाराष्ट्रातून बोल, असे आव्हान दिले आहे. राणा दाम्पत्य हे नाटक कंपनी असल्याचा उल्लेख देखील सय्यद यांनी केला आहे.