मुंबई -शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेत आहेत. शिंदे गटाकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शांततेचा पवित्रा घेऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद ( Actress Deepali Syed ) यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच संजय राऊत यांच्या परखड मतांचे यावेळी समर्थनही सय्यद यांनी केले आहे.
ट्विटद्वारे मांडली भूमिका - पुढील 2 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) एकत्र येऊन चर्चा करतील, असा दावा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केला होता. अनेक तर्कवितर्क यावरुन लढवले जात होते. दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मी भेटले. त्यांच्या बोलण्यातून दोघेही सकारात्मक जाणवले. हेच ट्विटद्वारे मी मांडले. दोन्ही बाजूच्या आमदारांचीही तीच भावना आहे, असे दिपाली सय्यद यांनी सांगितले आहे.
संजय राऊतमुळे शिवसेनेवर संकट ओढवल्याची चर्चा - शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर हे संकट ओढवल्याची चर्चा आहे. दिपाली सय्यद यांनी यावरुन राऊतांची पाठराखण केली आहे. राऊत आक्रमक आणि परखड बोलतात. पक्षाची भूमिका मांडतात. ते बिनधास्त आहेत. त्यांची भाषाशैली तशीच आहे. शिवसेनेला पाठिंबा देणे, ही भावना त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी दिसून येते. संजय राऊत त्याचे काम करत आहेत. भाजपलाही त्याच पद्धतीने बोलतात. परंतु, राऊतांनीही थोडी शांतता घ्यावी आणि ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे यावेळी सय्यद म्हणाल्या.