मुंबई - शिवसेनेत पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गट टीकेचे लक्ष्य बनला आहे. त्यामुळे बचावासाठी सातत्याने उद्धव ठाकरेंकडून युतीच्या चर्चा झाल्याचा आरोप सुरू झाला आहे. आता मुंबई महापालिकेत थेट शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा युतीचा फॉर्मुला का राखला नाही, असा सवाल उपस्थित करत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राणे आदरणीय नेते आहेत, अशी सारवासारव केली. मुंबई महापालिकेवर शिवसेनेने आपले पाय घट्ट रोवले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा या महापालिकेवर डोळा आहे.
मराठी माणूस मुंबई महापालिकेसाठी झगडतोय- आता शिंदे गटानेही मुंबई महापालिकेतील सेना- भाजप युतीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मुंबई मनपामध्ये शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळामध्ये केवळ चार जागांचा फरक होता. भाजपने शिवसेनेला त्यावेळी बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला होता. तोच फॉर्मुला पुढे चालू राहू शकला असता किंवा शिवसेनेच्या महापौर आणि भाजपचा उपमहापौर असेही करता आला असता. तसं झाले असते, तर मराठी माणसाचा आणि मराठी माणूस ज्या मुंबई महापालिकेसाठी झगडतोय. त्याचा स्वाभिमान कायम राखता आला असता, असे सांगत केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेल्या शिवसेनेच्या कामगार संघटनांवर भाजपसोबत वाटाघाटी करायला हव्या होत्या, असे मत मांडले आहे. मोठया माणसाच्या चर्चेत या विषय यायला हवा, असेही ते म्हणाले.
जेवढा पुढाकार घ्यायचा होता, तेवढा घेतला -यामुळे केसरकर यांचा रोख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत युती करायची होती, तेव्हा आम्हाला विश्वासात घेतले नाही. आम्ही देखील भाजपवर सोबत गेल्यावरून विश्वासघातकी, गद्दार बोलू नये. आदित्य ठाकरेंकडून अशी विधाने सातत्याने होत आहेत. त्यांची ही विधाने पेपर नॅपकिन ज्या पद्धतीने वापरून फेकला जातो, अशा स्वरूपाचे आहे. त्यामुळे कार्यकर्ते राहतील की माहीत नाही. मात्र, आजही मला शिवसैनिकांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी फोन येत आहेत. मी प्रयत्न केले, जेवढा पुढाकार घ्यायचा होता, तेवढा घेतल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले आहे.