मुंबई - शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेत मोठी बंडखोरी केली. भाजपच्या साथीने त्यांचे बंड यशस्वी झाले आणि मुख्यमंत्रपदाची माळ त्यांच्या गटात पडली. बंडखोरी झाल्यापासूनच शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार जुंपली आहे. राज्यात भाजपच्या मदतीने शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविले. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. भाजपचे राहुल नार्वेकर हे 164 विरुद्ध 107 अशा मतांच्या फरकाने निवडून आले. मात्र अभिनंदन प्रस्तावात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीपवरून शिंदे गटावर आगपाखड केली. त्यावरून शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी सुरेश प्रभू यांना फटकारले. अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर राजकीय फड सुरू करू नका, असे ते म्हणाले.
मुंख्यमंत्र्यांनी मांडला होता अभिनंदन प्रस्ताव -अध्यक्षपदासाठी उभे असलेले भाजपचे राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे साळवी यांना फक्त 107 मते मिळाली. नार्वेकरांच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मात्र, शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतला आहे. एकूण 39 आमदारांनी शिवसेनेचा पक्षादेश डावलून मतदान केले. याची नोंद घेतली असून तशी तक्रार विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे सरकार किती काळ टिकेल असा प्रश्नचिन्ह शिवसेना सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले. अभिनंदननाच्या प्रस्तावरती व्हीपचे संदर्भ देऊन आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. शिवाय आम्हाला कायदेशीर बाबी माहित आहेत. मात्र, त्यावर बोलण्याची ही वेळ नाही. आज केवळ अभिनंदनचा प्रस्ताव मांडला असून त्यावर सहयोगी आमदारांनी चर्चा करावी, असा सल्ला केसरकर दिला.