महाराष्ट्र

maharashtra

Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दलचे 'ते' ट्विट दीपक केसरकरांना खटकले

By

Published : Jul 9, 2022, 5:38 PM IST

भाजप नेत्यांकडून सातत्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केल्या जात असते. यावेळी ट्विटव्दारे (displeasure on tweet ) सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलेली टीका मात्र, केसरकरांच्या जिव्हारी लागली असल्याचं दिसुन येतयं. "आम्ही आमचे कुटुंब सोडून आलेलो आहोत. पण आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल कोणी काही बोलू नये." असे मत मांडून केसरकरांनी (Deepak Kesarkar ) आपली नाराजी व्यक्त केली.

Deepak Kesarkar
deepak kesarkar

मुंबई :शिवेसेनेतून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांसह बंड करुन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपा नेत्यांकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर सतत टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 'माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन' असे ट्विट (displeasure on tweet )केले आहे. यानंतर शिदें गटात गेलेले शिवसेना आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांनी नाराजी व्यक्त केली.

सोमय्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलासह एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीचा फोटो सोमय्या यांनी ट्विट करत, “मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केले,” असे म्हटले आहे.

आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल कोणी काही बोलू नये : सोमय्या यांनी केलेल्या ट्विट वर प्रतिक्रीया देत, शिंदे गटाचे पक्ष प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हणाले की, आम्ही आमचे कुटुंब सोडून आलेलो आहोत. पण आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल कोणी काही बोलू नये. आमच्या पक्षप्रमुखाबद्दल आम्हाला आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर कोणीही टीका करायची नाही, असे आमचे भाजपसोबत ठरले होते. किरीट सोमय्या यांना हे माहीत नव्हते.

काय म्हणाले दीपक केसरकर? किरीट सोमय्या च्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “ज्यावेळी आम्ही सर्व मुंबईत परत आलो. त्यावेळी भाजपाचे सर्व नेते आणि आमदार यांच्यासोबत बैठक झाली. देवेंद्र फडणवीस त्यावेळी बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी मी बोलताना, आमचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यात येऊ नये असे म्हटले होते. त्यांनी माझी विनंती मान्य केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्या समोर भाजपा नेत्यांना सांगितले होते की, राजकीय वाद होत असतात पण कोणत्याही जेष्ठ नेत्याबद्दल वक्तव्य करायचे नाही. किरीट सोमय्या यांच्या ट्विटबाबत मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलेले आहे. त्यांना भेटल्यानंतर आम्ही याबाबत बोलू आणि दोघांमध्ये जे काही ठरले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी याची विनंती करु. किरीट सोमय्यासोबत देवेंद्र फडणवीस बोलू शकतात. हे असे घडता कामा नये. असे कोणालाच आवडणार नाही,” असे दीपक केसरकर यांनी म्हटले. नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानतात, असेही केसरकर यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details