मुंबई -आज शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा ( Deepak Kesarkar on Sanjay Rathod ) विस्तार करण्यात आला. एकूण 18 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री राहिलेले ( Deepak Kesarkar on chitra wagh allegations ) शिवसेनेचे संजय राठोड, जे आता शिंदे गटात आहेत, यांचाही समावेश आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून हल्लाबोल केला आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते ( sanjay rathod ) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राठोड यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
संजय राठोड यांनी मंत्रिपद दिल्यावर चित्रा वाघ नाराज -शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या विस्तारात आरोप असलेले आमदार संजय राठोड यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्याबाबत पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ( chitra wagh tweet on Sanjay Rathod ) ट्विटमध्ये म्हटले, की पुजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवणार आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. शिवसेनेचे आमदार संजय राठोड ( Shiv Sena MLA Sanjay Rathod ) यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.