महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

WhatsApp Chat Bot : महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना पाणी, आरोग्य, शिक्षण आदी विविध सोयी-सुविधा दिल्या जातात. ८० पेक्षा अधिक अशा सेवा-सुविधा नागरिकांना दिल्या जात आहेत. या सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे देता यावी, म्हणून पालिकेने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सेवा सुरू केली आहे.

व्हॉट्सअप चॅट बॉट
व्हॉट्सअप चॅट बॉट

By

Published : Jan 14, 2022, 12:42 PM IST

Updated : Jan 14, 2022, 2:21 PM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ( WhatsApp Chat Bot ) सुविधेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ( Uddhav Thackeray Inauguration WhatsApp Chat Bot ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. यामुळे मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती व्हॉट्सअपद्वारे सहजपणे उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण -

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना पाणी, आरोग्य, शिक्षण आदी विविध सोयी-सुविधा दिल्या जातात. ८० पेक्षा अधिक अशा सेवा-सुविधा नागरिकांना दिल्या जात आहेत. या सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे देता यावी, म्हणून पालिकेने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सेवा सुरू केली आहे. यासाठी ८९९९२२८९९९ हा व्हॉट्सअप क्रमांक असणार असून त्याद्वारे मुंबईकरांना व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला यांची उपस्थिती -

याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते

घरबसल्या 80 सेवा - सुविधा मिळणार

मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका आहे. जिने जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या आहेत. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली. तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे, त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचा विचार व्हावा. सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खुप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का, याचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नव्या वर्षाची सुरुवात चांगली -

मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे. यंदा वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली. ५०० चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे आहेत. जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

देशातील सर्वोत्तम महापालिका

महापालिका म्हणजे नेमके काय, तिचे काम काय आहे हे जनतेला समजून सांगावे, अशा सुचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना दिल्या. तसेच मनपावरील कामाचा ताण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. महापालिका रोज काय काम करते, रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, धरणे बांधणे असेल ही सगळी कामे महापालिका कसे करते, घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी. ही माझी महापालिका आहे आणि ती देशातील सर्वात उत्तम महापालिका आहे, कारण ती जगातील उत्तम तंत्रज्ञान आणि सुविधा मला उपलब्ध करून देते याचा अभिमान वाटावा असा हा क्षण असल्याचे विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

मुंबई मनपाचे जागतिक स्तरावर कौतुक

कोविड काळात महापालिकेचे काम कौतूकास्पद होते. कौतूकासाठी महापालिका काम करत नाही, कर्तव्य म्हणून करतो. स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात. माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतुक जागतिक स्तरावर करण्यात आले. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

ऑनलाईन, पारदर्शक मॉडेल -

आज अत्यंत आनंदाचा दिवस. मकर संक्रांतीत अपेक्षित असलेले संक्रमण आपण आज माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत अत्यंत चांगल्या दिशेन करत आहोत ही आनंदाची बाब आहे. इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास देतो. महाराष्ट्रासाठी, समाजासाठी खुप काही चांगलं करण्याचा प्रयत्न आज होत आहे. इन्स्टा, फेसबूक चा महाराष्ट्र पर्यटनासाठी करणार आहे. तसेच कोविड चॅटबॉट आपण महापालिकेत सुरु केल. जगात अशी एक दोनच राज्ये, त्यात आपलाही समावेश असेल, असे उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. वर्क फ्रॉम होम कल्चर सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. पाणी पट्टी, घरपट्टी, वीज बिल भरणे असेल, महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा असेल अशा अनेक ८० हून अधिक सुविधा नागरिकांना या व्हॉटसअप चॅट बॉट द्वारे देण्याचा प्रयत्न असेल. माय बीएमसी टिव्टर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत हे पुढचे पाऊल हा दुहेरी संवाद, अडचणीचा सर्वस्तरावर पाठपुरावा करणे शक्य होईल. या द्वारे मुंबईकराचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आज हे जगातील एकमेव उदाहरण असेल की ८० पेक्षा जास्त सुविधा आपण नागरिकांना देत आहोत. ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे परिवर्तनशील पाऊल - अस्लम शेख

महापालिकेच्या सुविधांचा आज मुंबईकरांना घरी बसून लाभ मिळेल, याचा विशेष आनंद आहे. आय.टी क्षेत्रात भारताचे लोक जगात अग्रेसर आहेत. दुबई पेपरलेस झाले. त्याच धर्तीवर मुंबई महापालिका दुबई प्रमाणे पेपरलेस व्हावी. उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे खुप कौतुक वाटते. साध्या साध्या गोष्टीसाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन चकरा मारणे या उपक्रमामुळे थांबले आहे. यामुळे टेंडर प्रक्रियाही अधिक पारदर्शी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई शहर अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने बदलत आहे. कोविड काळात मुंबई पालिकेने केलले काम खुप कौतूकास्पद ज्याचे जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा वर्ल्ड बँक यांनीही दखल घेतल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

मुंबईकरांना नव्या सुविधा देण्यास मनपा आग्रही

कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करतांना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसॲप सुविधेद्वारे उपलब्ध होतील. मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देतांना खुप आनंद आणि समाधान वाटते. मुंबईकरांना नागरी सेवा सुविधा तत्परपणे उपलब्ध करून देण्यात महापालिका नेहमीच अग्रेसर राहिली आहे. संक्रमणात नवीन काही तरी शोधणे अपेक्षित आहे. त्यामुळे आजचा दिवस अतिशय औचित्यपूर्ण असल्याचे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडले. महापालिकेच्या आय.टी कक्ष, अधिकारी कर्मचारी कौतूकास पात्र आहेत. मुख्यमंत्री नेहमीच मुंबईकरांना नवनवीन सुविधा देण्यासाठी आग्रही असतात. कोस्टलरोडचे काम असो की आयटी सुविधा देण्याचे काम असो त्या सर्व गोष्टी सुरु राहिल्या आहेत. व्हॉटसअप चॅट बोटचा क्रमांक सेवा २४ तास उपलब्ध करुन देणार असल्याचे महापौर म्हणाले.

घरबसल्या अचूक माहिती मिळेल

अतिशय चांगला उपक्रम सुरु होत आहे. मागील काही महिन्यांसाठी यासाठी खुप मेहनत घेण्यात होती. आज या सुविधेमुळे ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम आहे. कोविड युद्ध लढताना आय.टीच्या सुविधा खुप महत्वाच्या आहेत. नागरिकांना घरी बसून गणपती परवाना, लायसन फी, वॉर्ड नंबरची माहिती मिळणे, वॉर्ड ऑफीसरचे नाव व इतर प्रश्न त्यांना या व्हॉटसअप चॅटद्वारे सुटण्यास मदत होईल. मागील दोन वर्षापासून कोविडशी लढतांना व्हॉटसअपची भूमिका महत्वाची. समुपदेशकांचा ग्रुप, वॉर्ड ऑफीसरचा ग्रुप, कोविड योद्ध्यांचा ग्रुप असे अनेक ग्रुप करून आपण कोविडशी नेटाने लढा दिला. नागरिकांना ८० सेवा सुविधांचा लाभ घरी बसून मिळणे ही निश्चित कौतूकास्पद असणार आहे. देशात असा उपक्रम सुरु करणारी बहृन्मुंबई महानगरपालिका पहिली महापलिका आहे. महापालिकेच्या व व्हाट्सअप टीमच्या लोकांनी अचूक व परिपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले.

Last Updated : Jan 14, 2022, 2:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details