महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई वातावरण कृती आराखड्याचे लोकार्पण, सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा - मुंबई महापालिका

मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) ‘मुंबई वातावरण कृती आराखडा’ ( MCAP ) अहवालाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Mar 13, 2022, 9:31 PM IST

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) ‘मुंबई वातावरण कृती आराखडा’ ( MCAP ) अहवालाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महापालिका प्रशासक आय.एस.चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या कृती वातावरण आराखडा लोकार्पण सोहळा होत असताना उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै, 2005 च्या पावसाची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावेळी झालेल्या अति प्रचंड पावसामुळे मुंबईकरांचे कसे हाल झाले होते. मातोश्री मध्येही पाणी शिरल्याची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.

तसेच वांद्रे कलानगर येथे सुरुवातीला राहायला गेले असता, अनेक लोकांनी आपण जंगलात रहायला गेलो असल्याचे म्हणत डिवचले. कलानगरच्या चौफेर बाजूने खाडी परिसर होता. त्यावेळी मुंबईत पाऊस पडला तर मातीचा सुगंध यायचा. मात्र, आता मुंबईत मातीचं उरलेली नाही. केवळ काँक्रिटीकरण करून विकास साध्य होईल का, अशी खंतही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. 2050 पर्यंत नरिमन पॉइंटचा 80 टक्के भाग हा पाण्याखाली जाण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता पासूनच आपल्याला खबरदारी घेणे गरजेचे असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्यादरम्यान दिला.

समुद्राच्या पाण्याचा उपयोग करायचा की नाही. इतरत्र जर समुद्राच्या पाण्याचा वापर होत असेल तर मुंबईने याचा विचार का नाही करायचा यावर आपण काम सुरू केले आहे. लवकरच आपण मुंबईच्या समुद्राचे पाणी पिण्यालायक करू, असे आश्वासन त्यांनी दिले. आरेचे जंगल वाचवून मी उपकार केले नाही, ते माझे कर्तव्य होते. राज्याच्या हितासाठी शक्य आहे ते मी मुख्यमंत्री म्हणून करणारच, असे म्हणाले.

हेही वाचा -Wadala Railway Station : आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचा वाचवला जीव

ABOUT THE AUTHOR

...view details