महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP Kisan Morcha : 'मंत्र्यांचे वीजबिल सरकार भरतं, मग शेतकऱ्यांचे वीजबिल का नाही?' देवेंद्र फडणवीसांचा सवाल - देवेंद्र फडणवीस वीजबिल बातमी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्ष पुन्हा ( BJP Agitation In Mumbai ) एकदा आक्रमक झाल असून आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालय ते विधान भवन इथपर्यंत भाजप किसान मोर्चा ( BJP Kisan Morcha ) काढण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस ( Dedendra Fadnavis Critisize State Government ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

BJP Agitation In Mumbai
BJP Agitation In Mumbai

By

Published : Mar 4, 2022, 5:20 PM IST

Updated : Mar 4, 2022, 5:29 PM IST

मुंबई -शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्ष पुन्हा ( BJP Agitation In Mumbai ) एकदा आक्रमक झाल असून आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालय ते विधान भवन इथपर्यंत भाजप किसान मोर्चा ( BJP Kisan Morcha ) काढण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Critisize State Government ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. भारतीय जनता पक्ष विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन धडकत आहे, हे समजतात अधिवेशन आपलं कामकाज आटपून सर्व मंत्री निघून गेले असल्याची टीका देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान केली. राज्य सरकार मंत्र्यांच्या घराचे विजबिल भरते तर मग शेतकऱ्यांचा वीज बिल राज्य सरकार का भरू शकत नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -

महाविकास आघाडी सरकार हे लबाड सरकार असून शेतकऱ्यांना सातत्याने फसवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. राज्यात तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना एकाही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले नाही. मात्र, आता हे सरकार सर्रास शेतकऱ्यांचा वीज कनेक्शन तोडत असल्याचा आरोप देवेंद्र फडणीस यांच्या कडून करण्यात आला. राज्य सरकार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळात नाही. मात्र, गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. तसेच उसाची एफआरपी राज्य सरकार दोन तुकड्यात देत आहे. दोन तुकड्यात एफआरपी देण्यात यावा, असा कोणताही कायदा अस्तित्वात नसताना देखील राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील हे सरकार करू शकले नाही. त्यामुळे अधिवेशनात या तिन्ही मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष विकास आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

'मुख्यमंत्र्यांना शेतीतलं काही कळत नाही' -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतलं काही कळत नाही. एक एकर आणि एक ट्रॅक्टरमध्ये काय फरक असतो? एक एकर मध्ये किती गुंठे असतात? शेतीला देण्यात येणारे पहिले पाणी, दुसर पाणी आणि तिसर पाणी काय असते? याबाबत मुख्यमंत्र्यांना काहीच माहिती नसल्याचा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. शेतीच मुख्यमंत्र्यांना काय कळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा कश्या कळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार असताना कोणत्याही शेतकऱ्याला त्रास दिला गेला नाही. शेतकरी अडचणीत असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी बांधावर जाऊन जीआर काढले. मात्र आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. त्यामूळे अधिवेशन काळात हजोरोच्या संखेने रस्त्यावर उतरुन शेतकर्यना आंदोलन करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

हेही वाचा -Anil Parab On ST Worker Strike : "एसटी कर्माचाऱ्यांना ही शेवटची संधी, अन्यथा..." अनिल परबांना केले आवाहन

Last Updated : Mar 4, 2022, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details