मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट सातत्याने होताना दिसत ( Corona Patients Decreased In Maharashtra ) असून, 5 हजार 455 नव्या बाधितांची नोंद झाली ( New Covid Patients In Maharashtra ) आहे. तर बरे होणारे रुग्ण 14 हजार 635 आहेत. राज्यात मृत्यूचा आकडा मात्र 63 इतका ( Covid Deaths In Maharashtra ) आहे. सक्रिय रुग्ण 60 हजार इतके असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ओमायक्रॉनचे 76 रुग्ण सापडले असून, सर्वाधिक 46 रुग्ण पुणे मनपा हद्दीतील असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येते.
तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात
कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागली ( Covid Third Wave Maharashtra ) असून, 5 हजार 455 रुग्ण सापडले आहेत. तर 14 हजार 635 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 76 लाख 26 हजार 868 इतकी आहे. हे प्रमाण 97.34 टक्के इतके आहे. 63 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृत्यूदर 1.82 टक्के इतके आहे. 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.29 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 35 हजार 88 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 10 हजार 718 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 60 हजार 902 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.