मुंबई : सध्या मुंबईतील मुस्लीम दफनभूमीत कबर विकल्या जात आहेत. हयात असलेल्या अनेकांनी तेथे कबरीसाठी जमिनीचा तुकडाही बुक केला आहे. मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. मात्र, आता ही कबर संगमवर दगडाने आणि विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली आहे. त्यामुळे एका बॉम्बस्फोटातील आरोपीची कबर सजवल्याने नकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. ही बाब समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई काढली आहे.
1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकुब मेमनला जिथे दफन करण्यात आले आहे. त्या कबरीची जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केली आहे अशीची चर्चा आहे. मुस्लिम दफनभूमी ट्रस्टीने विकली आहे का असा सवालही उपस्थित होत आहे. कारण मेमन दफन झाल्यानंतर साधी असलेली कबर आता सजली आहे. ओट्याला संगमरवरी दगड बसवले आहेत. LED दिवे लावले आहेत. जे रात्रीच्यावेळी चालू असतात. मुख्यतः मेमनच्या कबरीवर त्यांचा फोकस असतो. स्मशानभूमी विश्वस्तांकडून कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून वीजपुरवठा केला जातो. कबरीची जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरीला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल उपस्थित होत आहे.