मुंबई -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने घरात सजावट करून साजरी करण्यात आली. दरवर्षी जयंतीला मोठा जल्लोष असतो. या वर्षीच्या जयंती वर कोरोनाचे सावट असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
घरात सजावट करून आंबेडकर जयंती साजरी - news about corona
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती घरात सजावट करुन साजरी करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.आंबेडकरी अनुयायांनी घरातच रांगोळी आणि सजावट करत साध्यापणाने बाबासाहेबांना अभिवादन केले. सोशल मीडियावर बाबासाहेबांचे विचारांच्या पोस्ट लिहिण्यात आल्या.
कोरोना विषाणूमुळे आम्ही यावेळीची जयंती साधेपणाने साजरी करत आहे. जयंतीसाठी जमलेला निधी आम्ही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीसाठी देणार आहोत. त्यानुसार आमचे काम देखील सुरू आहे, असे आंबेडकरी अनुयायी चेतन अहिरे यांनी सांगितले.