मुंबई- राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हानिहाय वाटप करण्यासाठी आज मुंबईत सोडत जाहीर झाली आहे. राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषद अध्यक्ष सोडत होत असल्याचे ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर हेही वाचा -सर्व काही जुळवून घेण्यासाठी वेळ लागतोय - बाळासाहेब थोरात
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरल्याप्रमाणे अ आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले आहे. त्यावरुन मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ड्रॉ साठी जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होते.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत
- अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
- अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
- अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
- अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
- खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
- खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर