मुंबई -मुंबईतील वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी, तसेच मेट्रो प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी एमएमआरडीएकडून आणखी नव्या 12 मेट्रो गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील मेट्रो 2 ब (डीएन नगर ते मानखुर्द), मेट्रो 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि मेट्रो 9 (दहिसर ते मिरारोड) या तीन मार्गांसाठी नव्या 12 गाड्या खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. दुसरीकडे या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, लवकरच काम पूर्ण होणार असल्याचा विश्वासही एमएमआरडीएच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
विस्तारित मार्गासाठी गाड्याची खरेदी
एमएमआरडीएने दहिसर ते डीएन नगर असा मेट्रो 2 अ प्रकल्प हाती घेतला आहे. तर दहिसर ते अंधेरी पूर्व या मेट्रो 7 मार्गाचे काम देखील वेगात सुरू आहे. हे प्रकल्प 2021मध्ये पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या दोन्ही मार्गांचा विस्तार करण्यात आला आहे. या दोन विस्तारीत मार्गासह मेट्रो 9 मार्गासाठी जो की दहिसर ते मिरारोड असा आहे, या तीन मार्गांसाठी मेट्रो 12 नवीन गाड्या खरेदी करणार आहे.
'या' कंपनीकडून गाड्यांची खरेदी