महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय स्वागतार्ह - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Ramdas Athavale praises pm modi

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे मोदी सरकार असल्याची प्रचिती देणारा हा निर्णय असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Ramdas Athavale praises pm modi
80 कोटी गरीब मोफत अन्नधान्य

By

Published : Jun 8, 2021, 6:36 PM IST

मुंबई -दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांपर्यंत सर्वांना कोरणा प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे मोदी सरकार असल्याची प्रचिती देणारा हा निर्णय असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -दक्षिण मुंबईत 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक, म्हाडाकडून यादी प्रसिद्ध

महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले - आठवले

यापूर्वी मे, जून महिन्यात पीएम गरीब कल्याण अन्न योजनेतून अन्नधान्य गरिबांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जून महिन्याच्या पुढे दिवाळी पर्यंत या योजनेचा विस्तार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याण दृष्टीचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत, असे आठवले यांनी म्हंटले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर सतत टीका करीत होते, मात्र मोफत लस देण्याचा आणि गरिबांना अन्नधान्य वाटपाचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला असल्याने महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.

शिवभोजन योजनेव्यतिरिक्त राज्यशासनाकडून कुठलीही मदत नाही

महाराष्ट्रात मात्र शिवभोजन योजनेव्यतिरिक्त गरीब गरजूंना कोणतीही मदत अद्याप राज्यशासनाद्वारे मिळालेली नाही. राज्यातील कलावंत, शाहीर गायक, तमाशा कलावंत हाल अपेष्टा काढत आहेत. त्यांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे. मागील वर्षाभरापासून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनच्या बिकट दिवसांत गरिबांना कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. राज्यातील गरीब गरजूंना राज्य सरकारने त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना भरीव मदतीचे त्वरित वाटप करावे, असे आवाहन आठवले यांनी केले.

गरिबांना दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय योग्य

देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर वाढला आहे. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यांत कडक निर्बंध लागले आहेत. लॉकडाऊन लावण्यात आला आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मोलमजुरी मिळत नाही. रोजगार बुडाला आहे. त्यामुळे, गरिबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे. गरिबांचे हे दुःख नेमके ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण अन्नयोजनेद्वारे देशभरातील 80 कोटी गरिबांना दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि गरिबांप्रति त्यांची कटीबद्धता दाखविणारा निर्णय आहे, अशा शब्दांत आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले.

हेही वाचा -राज्यातील बंद उद्योगांना मिळणार ‘अभय’ योजनेचा दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details