मुंबई - मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात यंदाचा दसरा मेळावा कुणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावर राजकीय वाद सुरु आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटानेही अर्ज केला आहे (Dussehra Melava 2022). पालिका या अर्जांची छाननी करणार आहे. यापूर्वी दसरा मेळाव्यासाठी कोणत्या आधारावर परवानगी देण्यात आली आहे, हे तपासले जाणार आहे. (Decision on Shivaji Park for Dussehra Melava) पालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडून अर्जांची छाननी केली जाणार आहे. याचा अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार असून आयुक्त यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते.
Dussehra Melava 2022 - दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा निर्णय पालिका लवकरच घेणार - Dussehra Melava
शिवाजी पार्क मैदानात यंदाचा दसरा मेळावा कुणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावर राजकीय वाद सुरु आहे (Dussehra Melava 2022). या मेळाव्यासाठी शिंदे गटानेही अर्ज केला आहे. पालिका या अर्जांची छाननी करणार आहे. यापूर्वी दसरा मेळाव्यासाठी कोणत्या आधारावर परवानगी देण्यात आली आहे, हे तपासले जाणार आहे. पालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडून अर्जांची छाननी केली जाणार आहे. याचा अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार असून आयुक्त यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते (Decision on Shivaji Park for Dussehra Melava).
दसरा मेळावा वाद -दादर शिवाजी पार्क येथे गेले ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असे. बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होत आहे. २०१२ नंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यापूर्वी मेळाव्यासाठी परवानगीसाठीचा अडथळा कधीही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही झालेली नाही. यावेळी मात्र राजकीय समिकरण बदलले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर राजकीय चित्र बदलून गेले आहे. फुटलेला शिंदे गट आपण शिवसेनाच असल्याचा दावा करीत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून परवानगीसाठी अर्ज केल्यावर शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे केला आहे. २२ ऑगस्टला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उद्धव ठाकरे गटाकडून तर ३० ऑगस्ट रोजी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाकडून अर्ज केला आहे. या दोन्ही अर्जावर अद्याप पालिकेने निर्णय घेतलेला नाही. पालिकेने कोणालाही परवानगी दिली तर दुसरा पक्ष कोर्टात जाणार असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.
लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता -दसरा मेळावासाठी शिवाजी पार्कवर परवानगी कुणाला हा पेच पालिकासमोर आहे. गणेशोत्सवानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे पालिकेने म्हटले होते. त्यानुसार एक- दोन दिवसांत पालिकेकडून दोन्ही बाजूच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. मागील दसरा मेळावाबाबतचा इतिहास आणि देण्यात येणा-या परवानगीबाबत तपासले जाणार असून याचा अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाला पालिकेचे जी- नॉर्थ विभाग पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला जाणार आहे. पालिका आयुक्तांकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार याबाबत लवकरच स्पष्ट होणार आहे.