School reopening : पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांचा आज फैसला ? - पहिली ते चौथी शाळेपर्यंतचा निर्णय
गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. सरसकट शाळा सुरू व्हाव्यात याकरिता पालकांकडून दबाव वाढू लागला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha gaikwad) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांची टास्क फोर्स समितीसोबत (Task force) नुकतीच बैठक झाली.
![School reopening : पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांचा आज फैसला ? School reopening](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13729913-516-13729913-1637817431366.jpg)
पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांचा आज फैसला
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता सरसकट शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू करण्यावर (School reopening) त्यानंतर शिक्कामोर्तब केले जाईल.
कोरोनाची साथ आटोक्यात आला आहे. हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू केले आहेत. उपहारगृह, दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठ, कृषी विद्यापीठ सुरू केली आहेत. पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. १२ वर्षे वयोगटावरील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. सध्या इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग अद्याप सुरू केलेले नाहीत. मुलांच्या लसीकरणाशिवाय शाळा सुरू करू नयेत, असे टास्क फोर्स समितीचे म्हणणे होते. आता समितीच्या नव्या शिफारशीनुसार काही अटी शर्ती घातल्या आहेत. कठोर अंमलबजावणीच्या सूचना देताना, लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नगण्य असून पालकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे टास्क फोर्सचे म्हणणे आहे.
शाळांचा आज फैसला
गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. सरसकट शाळा सुरू व्हाव्यात याकरिता पालकांकडून दबाव वाढू लागला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची टास्क फोर्स समितीसोबत नुकतीच बैठक झाली. समितीने शाळा सुरू करण्यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल ठेवला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यावर शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.